Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

शिर्डीत होणार राज्यातील सर्वात मोठी गोशाळा! साई संस्थानचा मोठा पुढाकार.!!

साई संस्थांनच्या माध्यमातून रुई शिवारात 42 एकारात सर्वात मोठी गोशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांसाठी हा ऐतिहासिक निर्णय. असून शिर्डीत लवकरच गोशाळेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिए्टस चे संस्थापक अध्यक्ष ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे श्री साईबाबा संस्थान शिर्डी मार्फत गोशाळा चालविण्यात यावी यासाठी जाहीर निवेदन ईमेलद्वारे पाठविले होते त्यावर अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन , दुग्धविकास विभाग यांच्याकडे पुढील कारवाहीसाठी प्रकरण पाठविण्यात आले होते,

त्यानुसार मा. मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई यांचेकडे ॲड. वाघचौरे यांनी पाठपुरावा करून सदर गोशाळा प्रकल्पास मंजुरी मिळवली त्यानंतर अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन , दुग्धविकास विभाग यांचे आदेशानुसार श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या बैठकीत संस्थानचे वतीने देशी गाईची गोशाळा सुरू करण्याचे निर्णयाला मंजुरी मिळाली आहे

पहिल्या टप्प्यात भारतीय वंशाच्या देशी अर्थात गावरान १०० गाई गो -शाळेत दाखल होणार आहेत. या गोशाळेमुळे साई मंदिरात दैनंदिन होणाऱ्या आरती पूजाअर्चासाठी लागणारे गावरान गाईचे शुद्ध दूध व तूप तसेच द्वारकामाईतील पेटत्या धुनीसाठी शेणाच्या गवऱ्या उपलब्ध होणार आहेत.
यामाध्यमातून साईबाबा संस्थान गोशाळा सुरू करून देशभरात गोमाता रक्षणाचा महत्वपूर्ण संदेश पोहचवणार जाणार आहे.

भारतीय वंशाच्या देशी गावरान गाईंची गोशाळा सुरु करण्याचा तदर्थ समितीचा निर्णय स्वागताहार्य आहे. या निर्णयांमुळे गोरक्षणाचे महत्व तसेच आपल्या संस्कृतीत गोमातेला असलेले
अध्यात्मिक दृष्ट्या असणारे महत्त्वपूर्ण स्थान अधिक जनजागृती होण्यास अधिक मदत होईल तसेच परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती निवेदन कर्ते ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी दिली.


साई बाबा संस्थान मार्फत गोशाळा सुरू झाल्यानंतर भारतीय वंशांच्या गायीचे संवर्धन होईल,
द्वारकामाई धुनीत टाकण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या याचाही खर्च मोठा असतो या खर्चात गोशाळेमुळे बचत होणार आहे. साईबाबा संस्थानच्या लाडू प्रसादासाठी लागणारे देशी गावरान गाईचे शुद्ध तूप उपलब्ध होईल त्यामुळे लाडू प्रसादाचा दर्जा व क्वालिटी अधिक वाढेल,

तसेच इतर दुग्धजन्य पदार्थही अधिक शुद्ध व भेसळ विरहित प्राप्त होतील. श्री साईबाबा संस्थानने गोशाळा उभारणीस प्रोत्साहन दिल्यानंतर साई भक्तांकडूनही मोठी देणगीरूपी मदत या प्रकल्पामुळे होईल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button