Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
राजकीय

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई | अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. या फुटीनंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या दाव्यावर आता निवडणूक आयोग येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे. या सुनावणी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

sai nirman
जाहिरात

राष्ट्रवादी कोणाची याबद्द्ल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यासाठी सामान्य माणसाचा विचार महत्वाचा आहे, असे म्हणत जनतेला खरी परिस्थिती माहीती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? हे सामान्यांना माहिती आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार हे आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात सहभागी झाले. या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच दर्शनही घेतले. नियोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघर्षाबद्दल हे महत्वाचे विधान केले.

DN SPORTS

दरम्यान, सध्या शिवरायांच्या वाघनख्यांवरुन नवा वाद सुरू झाला आहे. लंडनमधून आणली जाणारी वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा काही इतिहासकारांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. मला याबद्दल काही ज्ञान नाही. मात्र वाघनख्यांबद्दल वाद नको.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button