Letest News
प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून
अ.नगरराजकीय

प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.

शिर्डी, दि.२३(उमाका)
गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने कोपरगांव शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. विविध कार्यालयात उत्सव काळात विविध उपक्रम स्वतंत्र आयोजित केले जातात. मात्र यावर्ष शहरातील प्रशासकीय कार्यालय यांनी एकत्र येऊन (दि.२२) रोजी माहिती आणि चित्ररथव्दारे कोपरगांवकरांना सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.

sai nirman
जाहिरात

या मिरवणुकीत तहसिल कार्यालय कोपरगांव, कोपरगांव शहर व तालुका पोलीस स्टेशन, कोपरगांव नगरपरिषद, पंचायत समिती कोपरगांव, वीज वितरण कोपरगांव यांचेसह काही कार्यालय सहभागी झाली होती. मिरवणुकीत प्र. प्रांताधिकारी धनंजय बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, तहसिलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक संदिप सोन्ने, मुख्याधिकारी अजित निकत, स्वच्छतादूत व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके, गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज, संदिप दळवी,नगररचनाकार अश्विनी पिंगळ, महावितरण वितरणचे कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, आदींसह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील एन. सी. सी., पॅरा मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी यांनी सहभागी होवून मिरवणूकीची शोभा वाढवली.

DN SPORTS

kamlakar

मिरवणुकीत तहसिल कार्यालय यांचा निवडणूक विभागाचा मतदार जागृती रथ, कोपरगांव नगरपरिषदेचा स्वच्छता, पाणी वाचवा, वृक्षारोपण आणि पर्यावरण संदेश रथ, पंचायत समिती घरकुल सह विविध योजना रथ, महावितरण यांचा सौर ऊर्जा योजना सह विविध माहिती रथ, कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचा सायबर क्राईम, डायल ११२, ध्वनी प्रदूषण जनजागृती करणारा रथ लक्षवेधी ठरत होते.

सनई, टाळ, मृदुंग, संबळ, हलकडी, ढोलकी, ढोल ताशा सह पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत शोभा आणली. मिरवणुकीत कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे टाळमृदुंग पथक लक्षवेधी ठरले.श्री गणेशोत्सव निमित्ताने कोपरगांव शहरात प्रथमच प्रशासनाने एकत्र येऊन दिशादर्शक आयोजित केलेल्या मिरवणूकीचे गणेश मंडळ आणि नागरिकांनी कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button