Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयसंपादकीय

नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान होणार गणराय

शिर्डी | प्रतिनिधी
‘नो डीजे, नो डॉल्बी… संस्कृती आणि परंपरेला सलाम!’ असा संदेश देत शिर्डीतील क्रांती युवक मंडळ यंदाही पारंपरिक पद्धतीने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः तयार केलेल्या ढोल-ताशा पथकाच्या गजरात गणरायांना पालखीत विराजमान करून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्कश डीजे आणि डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तरुणांनी स्वतःच्या कलेतून तयार केलेले ढोल-ताशा पथक हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय भारती आणि सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नशामुक्तीचा संदेश; वर्षभर अभियान
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नशामुक्त महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांती युवक मंडळाने यंदा आणखी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शिर्डीतील प्रसिद्ध डॉ. ओंकार जोशी यांच्या माध्यमातून नशामुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात येणार असून, त्यानंतर हे अभियान वर्षभर राबविण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.
विसर्जन मिरवणूक दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता द्वारकामाईसमोरून निघणार असून, शिर्डीकरांनी सहकुटुंब पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने आकाश वाडेकर, बबलू वरपे, किरण परदेशी, रितेश भालेराव, संदेश रत्नपारखी, ललित शेळके, राहुल हजारे आणि मोहन शास्त्री यांनी केले आहे.

| निर्व्यसनी तरुणाईचा आदर्श
‘क्रांती युवक मंडळ हे निर्व्यसनी तरुणांचे संघटन आहे. त्यामुळे नशामुक्ती अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. कुठल्याही नेत्याचा बॅनर न लावता मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या परिवाराच्या शुभहस्ते दररोज गणरायाची आरती केली जाते. आपली संस्कृती आणि परंपरा टिकविणे हाच मंडळाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मंडळाच्या विविध उपक्रमांना शिर्डीतील नागरिकांचा, विशेषतः महिलांचा मोठा सहभाग मिळतो.’
— सचिन तांबे पा., मार्गदर्शक, क्रांती युवक मंडळ

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button