शिर्डी | प्रतिनिधी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून रुई येथे आलेल्या आरोपीला शिर्डी पोलिसांनी माहिती मिळताच अवघ्या काही वेळात ताब्यात घेत धडक कारवाई केली. अक्षय सुभाष शिंदे (वय २७, रा. रुई, ता. राहाता) असे ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपीचे नाव आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता अक्षय शिंदे हा रुई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे व पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे यांनी रुई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला शिर्डी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीवर तत्काळ ‘ॲक्शन’; पोलिसांची कर्तव्यदक्षता कौतुकास्पद
हद्दपार व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा संबंधित परिसरात प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्पष्ट संदेश गेला आहे.
दैनिक साईदर्शनकडून पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचे निश्चितच कौतुक! पत्रकारिता म्हणजे केवळ पोलिसांच्या चुका दाखवणे नव्हे; जिथे पोलीस चांगले काम करतात, तिथे त्यांच्या कर्तव्यदक्षतेला प्रोत्साहन देणेही समाजहिताचेच काम आहे.