मुंबई | प्रतिनिधी

कायदेविषयक क्षेत्रात आपल्या ज्ञानाची आणि अभ्यासाची छाप उमटविणाऱ्या अॅड. गौरव जितेश लोकचंदानी यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. NMIMS (Narsee Monjee Institute of Management Studies) येथील Intellectual Property Rights Cell (IPRC) च्या वतीने आयोजित IPRC Intra Novice Intellectual Property Advocacy Competition 2026 मध्ये ‘Judge’ म्हणून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अॅड. गौरव लोकचंदानी यांना ‘Memento of Appreciation’ देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे युक्तिवाद, कायदेशीर मांडणी आणि बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित विविध पैलूंचे मूल्यमापन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा असल्याचे Intellectual Property Rights Cell, NMIMS यांनी प्रशस्तीपत्राद्वारे नमूद केले आहे.
“तुमचा अमूल्य वेळ, विषयातील कौशल्य आणि योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरव; तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि सूक्ष्म मूल्यमापनामुळे स्पर्धेच्या यशात मोलाची भर पडली,” अशा आशयाचे प्रशंसापत्र अॅड. गौरव लोकचंदानी यांना प्रदान करण्यात आले.
कायदा क्षेत्रात नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची सनद प्राप्त केल्यानंतर गौरव यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या ज्ञान, अभ्यासू वृत्ती आणि बौद्धिक संपदा कायद्याच्या क्षेत्रातील वाढत्या योगदानाची दखल मानला जात आहे.
पालकांसाठी अभिमानाचा क्षण
पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जितेश लोचंदानी यांचे सुपुत्र अॅड. गौरव लोचंदानी यांनी शिक्षण, कायदा आणि बौद्धिक संपदा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आपल्या मुलाच्या या सन्मानामुळे लोचंदानी परिवाराच्या आनंदात भर पडली असून, मेहनत, ज्ञान आणि सातत्याच्या जोरावर गौरवने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.