Letest News
साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी!
अ.नगर

घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीरीत्या राबवा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

  अहमदनगर दि. 7 ऑगस्ट (जिमाका) :- केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले असुन यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हे अभियान 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवुन अत्यंत उत्साहवर्धकतेने व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

            बैठकीस जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व  उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियानानिमित्त तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रब्युट व तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.

            सर्व संबंधित यंत्रणांनी ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्वत्र ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी घेऊन harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले. 

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी करुन घ्या

            2024 या वर्षात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले.

            जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना या स्पर्धेविषयी माहिती देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या              

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button