Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
राजकीयशिर्डी

मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणाघाती सवाल

शिर्डी | प्रतिनिधी
“शिर्डी आणि परिसरात फिरताना एका मंत्र्याचा मुलगा पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून आपल्या पुढे-मागे पोलीस गाड्या ठेवायला भाग पाडतो. पोलीस अधिकारी हे कोणत्याही मंत्र्याच्या मुलाचे गुलाम नाहीत; ते शासनाचे अधिकारी आहेत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे,” असा घणाघाती आरोप भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला.
शिर्डी परिसरात मंत्र्याच्या मुलाच्या पुढे-मागे पोलीस वाहनांचा ताफा फिरत असल्याचे व्हिडिओ सामान्य नागरिकांकडून आपल्याला पाठविले जात असल्याचा दावाही पिपाडा यांनी केला. “मंत्र्याला सुरक्षा मिळणे हा स्वतंत्र विषय आहे; मात्र मंत्र्याचा मुलगा आपणच मंत्री आहोत अशा रुबाबात फिरत असेल आणि त्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असेल, तर हा गंभीर प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
पोलिस अधिकाऱ्यांना नियमबाह्य अथवा बेकायदा आदेश देण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस दलाने कायद्याप्रमाणे काम केले पाहिजे. कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या दबावाखाली काम करण्याची वेळ पोलिसांवर येऊ नये, अशी भूमिका पिपाडा यांनी मांडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“सामान्य नागरिकांना एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची मदत मिळवण्यासाठी अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो; मात्र एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलासाठी पोलीस वाहनांचा ताफा उपलब्ध होत असेल, तर याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यायला हवी,” असा सवालही पिपाडा यांनी उपस्थित केला.
‘बदनामीच्या प्रयत्नांनी माझा वेग दुप्पट होतो!’
“मी सत्य बोलतो म्हणून माझी बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. उलट अशा प्रत्येक प्रयत्नामुळे माझ्या कामाचा स्पीड डबल होतो.

जनतेचे प्रश्न मांडणे आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणे हे माझे काम आहे,” असा इशाराही डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिला.
दरम्यान, पोलीस वाहनांचा वापर नेमका कोणत्या अधिकृत कारणासाठी केला जात आहे, संबंधितांना कोणत्या प्रकारची सुरक्षा मंजूर आहे आणि त्याबाबतचे आदेश काय आहेत, याबाबत पोलीस प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button