Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
अ.नगरक्राईम

राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर!

राहाता | प्रतिनिधी
सोशल मीडियाचा वापर समाजजागृतीसाठी होण्याऐवजी एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला जात असेल, तर त्याची किंमत संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेतून मोजावी लागू शकते. राहाता शहरात अशाच प्रकारे व्हॉट्सॲप ग्रुप आणि स्टेटसवर बदनामीकारक मजकूर व छायाचित्र प्रसारित केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी डॉ. राजेंद्र मदनलाल पिपाडा यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ‘वई लव राहाता तालुका’ आणि ‘चेअरमन स्वप्निल गाडेकर’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर डॉ. पिपाडा यांचे रंगीत छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह व मानहानीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला. एवढ्यावरच प्रकार थांबला नाही, तर संबंधित पोस्ट संशयितांनी आपापल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या प्रकरणी हरिभाऊ गाडेकर, भाऊसाहेब उर्फ मुन्ना सदाफळ, कैलास विठ्ठल सदाफळ, संजय रामचंद्र सदाफळ, विजय डी. सदाफळ आणि प्रविण रमणलाल रुणवाल, सर्व रा. राहाता, यांच्याविरुद्ध पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर काहीही टाकण्याआधी सावधान!
सोशल मीडियावर एखाद्याचा फोटो वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे, पोस्ट पुढे पाठविणे अथवा स्टेटसवर ठेवणे याबाबत तक्रार झाल्यास संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ‘व्हायरल’च्या नादात कायद्याची मर्यादा ओलांडणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

: बदनामीच्या प्रयत्नांना कामातून उत्तर!
“जेवढी माझी बदनामी कराल, तेवढ्याच वेगाने माझे सामाजिक कार्य वाढत जाईल. टीका आणि बदनामीला घाबरण्याऐवजी समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याचा माझा निर्धार आहे.”
— डॉ. राजेंद्र पिपाडा

नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्यावरही गुन्हा दाखल!
राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्याविरुद्धही पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि बदनामीकारक पोस्टच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, संबंधित पोस्टचा प्रसार, त्यातील मजकूर आणि त्यामागील भूमिका याबाबत तपासानंतर अधिक स्पष्टता होणार आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकताना सावधान; कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button