Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
अ.नगर

विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा नागरीकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

sai nirman
जाहिरात

भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्ह्यात दि. 8 व 9 जुलै 2024 रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

DN SPORTS

kamlakar

नागरीकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये, विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या , लोंबाणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.

जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळो स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

*

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button