Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

पोलीस पाटीलाच्या घरावर चोराचा डल्ला… एक लाख रुपये लांबविले…

कोपरगाव शहारालगत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकाण यांच्या घरात चोराने प्रवेश करून पॅन्ट च्या खिशातील साठ हजार व लाकडी कपाटावर ठेवलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या बाबतीत अधिक असे की जेऊर पाटोदाचे पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री तीन साडेतीन च्या सुमारास प्राथविधी करिता घराबाहेर असलेल्या शौचालयात गेले जाताना त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता गेले व तेथून पुन्हा घरात येऊन अंघोळीकरिता घरातील बाथरूमात गेले मात्र त्यावेळेस ही त्यांनी घराचे दार लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावले नाही

याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन पॅन्टच्या खिशात असलेले साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला. पोलीस पाटील हरिभाऊ केकाण हे अंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेली पॅन्ट दिसून न आल्याने त्यांनी त्यांनी लाकडी कपाटावर असलेले पैसे घेण्याकरिता घेले असता त्यांना तेथीही पैसे दिसून न आल्याने त्यांनी पॅंटीचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचे दिसले

त्यांनी आपल्याघराबाहेर असलेल्या सिसिटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस स्टेशनाला कळविले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, व पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पुढील तपास सुरु केला. यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकाण यांनी सविस्तर माहिती दिली

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button