शिर्डी ( प्रतिनिधी)-
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाचे प्रतीक! मात्र या विश्वासाला आरोपी चैतन्य पाटील यांने तडा दिला आहे.
ज्याने बहीण म्हणून तरुणीला राखी बांधली. तिलाच नंतर त्यांने धमक्या देण्यास सुरुवात केली व या तरुणीचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केला. रक्षाबंधनाच्या दिवशी 2 वर्ष चैतन्य अरुण पाटील याने फिर्यादी तरुणीला राखी बांधली होती. मात्र नंतर याच चैतन्य पाटील याने संबंधित तरुणीला वारंवार संपर्क साधून मानसिक त्रास देणं सुरू केले. फोन व्हाट्सअप वर संपर्क करून धमक्या तिला जात होत्या. तरुणीने हे सहन झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनाक्रमामुळे रक्षाबंधनाच्या पवित्र नात्यातील विश्वास आणि त्यामागील भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राखी बांधून रक्षणाचे नाते जोडायचे असा हा रक्षाबंधनचा सण असतो पण या प्रकरणातील आरोपीने ज्या तरुणाला बहीण मानली त्याच तरुणीला धमक्या देणे सुरू केल्याने कथित धमक्यांचा सामना तरुणीला करावा लागला. हा विरोधाभास नेमका काय सांगतो? या प्रश्नाचे उत्तर निष्पक्ष तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
इन्स्टाग्रामवरील मैत्रीपासून ते बहीण मानेपर्यंत व त्यानंतरही थेट तरुणीचे करिअर उद्ध्वस्त करण्यापर्यंत मजल जाणाऱ्या या प्रकरणातील आरोपीची मानसिकता व त्याची पाठीमागील पार्श्वभूमी शोधणे गरजेचे आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, जुलै २०२४ पासून चैतन्य अरुण पाटील याचा संबंधित तरुणीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मित्र म्हणून संपर्क होता. त्यानंतर मोबाईल कॉल, व्हॉट्सॲप संदेश आणि अन्य माध्यमांतून वारंवार संपर्क साधण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
‘तुझे करिअर खराब करेल, तुझे आयुष्य खराब करेल,’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने तरुणीने आपल्या मोठ्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही प्रकार थांबला नसल्याने अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चैतन्य पाटीलला अटक या प्रकरणात झाली.
या प्रकरणी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८६७/२०२६ दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७८, ३५२, ३(५) तसेच पॉक्सो कायदा २०१२ मधील कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिर्डी
पोलिसांनी चैतन्य अरुण पाटील याला अटक करून राहता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची नाशिकला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. याच प्रकरणात त्याला साथ देणारा दुसरा संबंधित नीच आरोपी मितांशू हरीश ऊर्फ बब्बलू प्रेमानी हा मात्र त्याचवेळी फरार झाला. या प्रकरणात मितांशू प्रेमानी याचा आरोपी चैतन्य पाटील यांच्याशी काय संबंध आला, या प्रकरणात त्याचा काय रोल आहे. हे सुद्धा तपासणी गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात नेमके कारण काय? आपल्या जाळ्यात या तरुणीला प्रथम बहीण म्हणून नंतर फसवून किडनॅप करण्याचा तर प्रयत्न नव्हता ना? किंवा एखाद्या गोष्टीच्या बदला घेण्यासाठी हा प्रकार करण्यात आला का? यामागे दुसरे अजून काही कारण आहे. याची सविस्तर चौकशी होऊन खुलासा होणे गरजेचे आहे. कारण हा प्रश्न एका मुलीच्या संपूर्ण आयुष्याशी निगडित आहे. विनाकारण धमक्या देऊन तिला बदनाम करणं हे तिच्या जीवनाशी खेळण्यासारखं आहे.
मुलीच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही!
सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध झाल्याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील मुलीला लक्ष्य करण्यात आले का, असही खाजगी चर्चेतून प्रश्न समोर येत आहे. हा मुद्दा या प्रकरणातील महत्त्वाचा तपासाचा स्रोत आहे. वैयक्तिक राग किंवा वादातून एखाद्या तरुणीच्या भविष्यावर परिणाम करणारा त्रास दिला जात असेल, तर अशा प्रकारांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. कारण एखाद्या निष्पाप मुलीचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्याची घटना आणि त्यानंतरच्या कथित प्रकारांचा नेमका संबंध काय, संबंधित व्यक्तींची भूमिका काय आणि फिर्यादीत नमूद केलेल्या घटनांमागील सत्य काय, हे निष्पक्ष तपासातून समोर येणे गरजेचे आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव करीत आहेत. उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी, संपूर्ण घटनाक्रमाचा तपास आणि संबंधित आरोपींच्या भूमिकेची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
राखीचा धागा हा विश्वासाचा असतो; त्या विश्वासाला तडा देणाऱ्या कोणत्याही वर्तनाला समाजात स्थान असू नये. रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याचा मान राखला गेला पाहिजे आणि या प्रकरणातील सत्य कायदेशीर प्रक्रियेतून समोर आले पाहिजे. व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तरच यापुढे अशा नाजूक व महत्त्वाच्या सणावर विश्वास राहील. असे आता मुलींच्या पालक वर्गातून बोलले जात आहे.
DN SPORTS
जाहिरात