Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
राजकीयशिर्डी

दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सोमवार, दि. १९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात करण्यात आली. श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांच्या वंशज परिवारातील अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली.
उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान झाल्यानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती करण्यात आली. सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा, तर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा संपन्न झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सकाळी १० वाजता कोल्हापूर येथील ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, उत्सवाच्या सांगता दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत पुणे येथील सौ. पद्मावती पारेकर व निनाद ग्रुप यांचा ‘भक्तिसंगीत’ कार्यक्रम, तर दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत पद्मश्री विजय घाटे यांचा ‘तालचक्र’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी ६ वाजता श्रींची धूपारती झाली. त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत मुंबई येथील श्री राजेश कृष्णा खर्डे (वेसावकर) यांचा ‘परंपरा साईंची’ हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर आयोजित करण्यात आला. रात्री १० वाजता श्रींची शेजारती होणार होती.


हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button