Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
Blog

भोजापुर धरण प्रकल्पाचे‌ प्रश्न व कालव्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू— खासदार सदाशिव लोखंडे

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथे भोजपुर धरण प्रकल्पासंदर्भात नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
भोजपुर धरण व कालव्या संदर्भात विविध रखडलेले प्रश्नां बाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


गेल्या 45 वर्षापासून भोजापुर प्रकल्पाचे प्रश्न रेंगाळलेले असून ते सोडवण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुढाकार घ्यावा. असे लाभधारक शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली. अनेक प्रश्न खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुढे मांडले. त्यानंतर भोजापुर प्रकल्पाच्या सोळा किलोमीटर करण्यासाठी तब्बल 51.63 कोटी रुपयांचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मंत्रालयात पाठवावा अशी सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या .आपण त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी दिले.


निळवंडे चा कालवा झाला ,पाणी आले, तसेच भोजापुर धरणाचा 16 किलोमीटरचा कालवा लवकरात लवकर होऊन या भागात पाणी यावे. हा भाग त्यामुळे सधन होईल .बागायती होईल .अशी शेतकऱ्यांची मागणी असून खासदार सदाशिव लोखंडे यांनी यासाठी आपण आवश्यक तो पाठपुरावा करू असे शेतकऱ्यांना यावेळी सांगितले.
या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, लाभधारक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button