Letest News
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हरीनामाने दुमदुमली 15 चारी भक्तिमय वातावरणात बालगोपाळां सह शिक्षकांनी पावली वर धरला ठेका श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!” सावळे कुटुंबियांनी संघटित गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी मधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला 19 वर्षांनंतर ठाकरे एकत्र अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता ह्या क्ष... shirdicrimenews ठकसेन भोप्या साळवे याच्या अर्चणीत वाढ़ राहाता येथेही गुन्हा दाखल साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या वि... पोलीस अधीक्षकसह शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऍक्शन मोड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला केले हद... सिंघम हेमंत पाटलाने करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेन भोप्या पाटीलला केली अटक
क्राईमशिर्डी

निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खाते

शिर्डी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव कोऱ्हाळे गावातील श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल ४१ कोटी ९७ लाख १७ हजार ४० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर सहकार खात्याने जबाबदारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर आणि व्यवस्थापक अनिल खैरे या तिघांना अटक केली आहे. पतसंस्थेचे एकूण १९ संचालक व आठ कर्मचारी यांच्यावर भारतीय सहकारी कायद्यातील कलम ८८ अन्वये कारवाई प्रस्तावित असून, त्यांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा चढवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

या प्रकरणातील काही संचालक आता हयात नसल्याने त्यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरही बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राहाता येथील सहकार खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे. संस्थेच्या हिशोबात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत. संस्थेच्या खात्यात रोख रक्कम केवळ ४ लाख ६२ हजार ९७६ रुपये होती,

परंतु तीही सध्या शिल्लक नाही. २८ लोकांना कॅश क्रेडिट कर्ज देण्यात आले असून त्यातून २ कोटी ३८ लाख ११ हजार रुपये येणे बाकी आहे. हाय परचेस कर्जाच्या स्वरूपात ८६ लोकांना कर्ज दिले गेले असून, १ कोटी ९४ लाख ८८९५ रुपये येणे बाकी आहे.

४३ कोटी दोन लाख २८ हजार ७२० रुपये येणे अपेक्षित आहे. दीर्घ मुदत ठेव स्वरूपात १७२ लोकांनी १ कोटी १४ लाख ५८ हजार ९९३ रुपये ठेवले होते, तर अल्प मुदत ठेवी पोटी १३४ ठेवीदारांनी ७० लाख ५५ हजार ८४५ रुपयांच्या ठेवी केल्या होत्या. ज्ञानेश्वर दैनिक मंगल ठेव योजनेत १५३२ ठेवीदारांनी १ कोटी ७१ लाख ८१ हजार ४०१ रुपयांच्या अनामक ठेवी संस्थेकडे ठेवल्या होत्या.

कर्ज वितरण करताना कर्ज अनामत रक्कम म्हणून ३३८ जणांकडून ४३ लाख ५६ हजार २९० रुपये कपात करण्यात आले होते, पण ती रक्कमही गायब आहे. मध्यम मुदत ठेवी पोटी ६७३७ ठेवीदारांनी ४२ कोटी ७६ लाख २२ हजार ६८३ रुपयांच्या ठेवी केल्या होत्या. सेव्हिग खात्यात २५१४ खातेदारांचे ६ कोटी ३१ लाख ४७ हजार १२१ रुपये असणे अपेक्षित होते, मात्र तेही गायब आहेत.

संस्थेच्या कोणत्याही खात्यात कोणतीही शिल्लक रक्कम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या प्रकारात काही ठराविक व्यक्तींमुळे दोष नसताना काही निरपराध संचालक अडचणीत आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. संस्थेचा कर्मचारी नितीन महाजन सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून गेला असतानाही ठेवीदारांच्या उलटून पैशांचे काय होणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. सहकार खात्याकडून संबंधित कालावधीतील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, नेमका गैरव्यवहार कधी झाला याचा शोध घेण्यात येत आहे. गैरव्यवहारात कोण किती जबाबदार आहे,

याचा सखोल अभ्यास करून संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाणार असून, त्यानंतरच वसुलीसाठी पुढील पावले उचलली जातील. पोलिसांनी अटकेत असलेल्या तिघांची कसून चौकशी सुरू केली असून, उर्वरित संचालक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरवण्यासाठी सहकार खाते प्रक्रिया गतिमान करत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button