Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
Blog

साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून चोरांनी दिली बगीच्यात हिरवीगार सलामी..!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या 200 रूम गार्डन मधून रात्रीच्या वेळी चक्क चंदनाचे झाड कापून गाभा चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही साईबाबा संस्थानच्या विविध विभागांमध्ये चोरीचे प्रकार घडल्याच्या घटना घडल्या आहेत मग त्यात विद्युत विभागाच्या भांडार गृहातून विद्युत वस्तूंची चोरी असो वा देणगी काऊंटर वरील पावत्यांची अफरातफर करून पैशांची झालेली चोरी असो तसेच काही दिवसांपूर्वी साई नगर येथील इमारती मागील टेलिफोन च्या वायर चोरून नेण्याचा एक नव्हे दोनदा प्रकार घडल्याने साईबाबा संस्थानच्या वस्तू सुरक्षित कधी होणार हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


सदर घटना ही गेल्या रविवारची असून रात्रीच्या वेळी 200 रूमचे गार्डन बंद असते. मात्र त्या परिसराची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात त्या सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवत चोरट्यांनी चंदनाचे झाड सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून अंधाराचा फायदा घेत कापून नेल्याने याबाबत मोठी चर्चा शिर्डीत होत आहे.याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे साईनगर इमारतीच्या मागील बाजूस 37 हजारांची टेलिफोन आरमाड केबल चोरी गेली असून या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा रजिस्टर नंबर 1010/2023 भारतीय दंड संहिताचे 1860 नुसार 379,511 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 10 हजार रुपये किमंतीचे चंदन झाड चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 1048/2023 भारतीय दंड संहिता 1860 नुसार 379 कलमान्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.

kamlakar


याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 29/10/2023 1/11/2023 दरम्यान ते 200 रूम जवळील साई नगर इमारतीच्या पाठीमागील बाजूस चोरीची घटना घडली त्यावेळी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्त निवासचे सर्व टेलिफोन बंद पडल्याने संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तेथील टेलिफोन सर्व्हर तपासले असता कुठेतरी वायर कट झाल्याचे निदर्शनास आले मग संपूर्ण वायरिंग तपासली असता साई नगर रहिवासी इमारतीच्या मागील बाजूस चोरट्यांनी चक्क 37 हजारांची केबलच चोरून नेल्याची घटना समोर आलीआहे. होते न होते तोच पुन्हा हाच प्रकार झाला मात्र तेथील काही रिक्षा चालकांच्या नजरेत हा प्रकार आला आणि त्यांनी वायर चोरून नेणाऱ्या महिलांना हटकले आणि चोरीचा प्रकार समोर आला या चोरीच्या घटनेत बाभळेश्वर येथील तीन महिला पकडल्या गेल्या व त्यानंतर हा प्रकार थांबला.

मात्र काहीच दिवसांनी पुन्हा थेट गार्डन मध्ये चोरी झाली आणि भले मोठे चंदनाचे झाडच चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली आणि कोणाच्याही नजरेत आले नाही. परंतु साईबाबा संस्थानच्या परिसरात अश्या चोऱ्या होणे आणि तेसुद्धा सुरक्षा रक्षक तैनात असताना यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढत असून ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून त्वरित याबाबत पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे साई भक्त, ग्रामस्थ व येथील रहिवासी बोलत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button