Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांनी वाहनधारकांच्या चिंतेत भर पडलेली असतानाच शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका अट्टल मोटारसायकल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासाची दमदार कामगिरी समोर आली आहे.
विशाल रतन चव्हाण (वय २४, रा. एमआयडीसी, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर; हल्ली रा. कालिकानगर, शिर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. 806/2026, भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित विशाल चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरी केलेल्या अन्य मोटारसायकली शिर्डी, पैठण, बिडकीन, चाळीसगाव, नगरदेवळा आणि सोयगाव परिसरात ठेवल्याची माहिती त्याने दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी जाऊन एकूण ११ मोटारसायकली हस्तगत केल्या. विशेष म्हणजे या वाहनांपैकी काहींच्या चोरीबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शिर्डीपासून चाळीसगाव-नेवासापर्यंत चोरीचे धागेदोरे
पोलिसांच्या तपासात आतापर्यंत शिर्डी पोलीस ठाण्यातील दोन, श्रीरामपूर शहर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि नेवासा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा किमान सहा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा संबंध समोर आला आहे. त्यामुळे आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईनच्या चार मोटारसायकली, हिरो स्प्लेंडर प्लसच्या दोन, टीव्हीएस स्टार सिटी प्लस, बजाज पल्सरच्या तीन मोटारसायकली यांचा समावेश असून दोन मोटारसायकली विनानंबर अवस्थेत मिळून आल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्यासह संतोष लांडे, राघव कोतकर, केवलसिंग राजपूत, नामदेव नालेगावकर, अजय अंधारे, सुनील दिघे, मंगेश भोसले, अकिब इनामदार व होमगार्ड रोहित सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.


या कारवाईचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष लांडे व पदवीधर पोलीस अंमलदार राघव कोतकर करीत आहेत.
चौकट : चोरट्यांच्या टोळीपर्यंत तपास पोहोचणार?
एका आरोपीकडून तब्बल ११ मोटारसायकली जप्त झाल्याने या चोरीच्या घटनांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीची वाहने कोणाला विकली जात होती, तसेच वाहन चोरीचे आणखी गुन्हे या आरोपीच्या खात्यावर आहेत का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. शिर्डी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविल्यास मोटारसायकल चोरीच्या आणखी घटनांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button