Letest News
गुटखा कारवाईत निमगावचा जावेद शेख फरार! LCBची धडक मोहीम सात आरोपींवर तीन गुन्हे शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी
राजकीयशिर्डी

शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उपक्रम

शिर्डी | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या शुभपर्वाचे औचित्य साधून सन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीकर नागरिकांसाठी विशेष आधार नोंदणी, आधार दुरुस्ती व डाक विभागाच्या विविध सेवांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे विशेष शिबिर गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत श्री साईबाबा संस्थान, गेट क्रमांक ४ येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची नवीन आधार नोंदणी मोफत करण्यात येणार आहे. त्यासाठी बालकाचा जन्म दाखला तसेच आई किंवा वडिलांपैकी एका पालकाचे आधार कार्ड आवश्यक असून पालकांपैकी एकाची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक आहे.
याशिवाय नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी आधारमधील आवश्यक दुरुस्ती व अपडेटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी ₹७५, तर बायोमेट्रिक अपडेटसाठी ₹१२५ शुल्क असून इतर सेवांसाठी शासन नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती
शिबिरामध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते (SB), PPF, सुकन्या समृद्धी योजना, अपघात विमा योजना तसेच डाक विभागाच्या इतर विविध बचत व शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन नागरिकांना मिळणार आहे.
आपल्या फोटोचे ‘My Stamp’ही बनविता येणार
या शिबिराचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘My Stamp’ सुविधा. नागरिकांना स्वतःच्या किंवा आवडत्या फोटोसह वैयक्तिकृत टपाल तिकीट तयार करून घेता येणार आहे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, विशेष प्रसंग, कुटुंबीयांच्या आठवणी अथवा भेटवस्तू म्हणून हे वैयक्तिकृत टपाल तिकीट उपयोगी ठरू शकते.

Color

Text

Background

Typography

FONT SIZE

S

M

L

XL


तसेच सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना आणि उपलब्ध इतर शासकीय योजनांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिर्डी परिसरातील नागरिक, पालक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

.सामाजिक-सांस्कृतिक वसा जपणारे ‘अण्णा’!
माजी नगरसेवक गजानन (अण्णा) शेरवेकर यांनी शिर्डीच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यात नेहमीच योगदान दिले आहे. श्री साईबाबांच्या पालखी रथापुढे ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून सेवा देत साईभक्तीचा जागर करण्याची त्यांची परंपरा विशेष उल्लेखनीय आहे. सामाजिक बांधिलकी आणि साईभक्तीची सांगड घालत शिर्डीच्या सांस्कृतिक वैभवाला जपण्याचे कार्य अण्णा सातत्याने करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button