Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
राजकीयशिर्डी

शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण

शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भा.प्र.से. अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, संदीपकुमार भोसले, कार्यकारी अधिकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वऱ्हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्यासह संस्थानचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर गोरक्ष गाडीलकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध नवे उपक्रम राबविण्याची घोषणा केली.
दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील कायदेशीर लढ्याला यश
यावेळी गाडीलकर यांनी श्री साईबाबांविषयी दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात संस्थानने सुरू केलेल्या कायदेशीर लढ्याबाबतही माहिती दिली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर GAC कडून संबंधित व्हिडीओ व लेख २४ तासांत हटविण्याचे आदेश जारी झाल्याचे त्यांनी सांगितले.


या कायदेशीर लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच संस्थानची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ वकील प्रमोद कुमार दुबे व त्यांच्या सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या विद्या मंदिरचे उपाध्यापक वसंत वाणी व क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button