Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
शिर्डी

साई माऊली परिवारा कडून 36 फुटी जरी बुटी राखी साईबाबा चरणी अर्पण

रक्षाबंधना निमित्‍त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्‍य राखी समर्पित केली. या बद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की, ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १० दिवसांत बनवली असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहेत. प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते, तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे. या राखीचे श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ वंदिना गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ ज्‍योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्‍त प्रबोधराव यांचे हस्‍ते विधीवत पुजन करणेत आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button