Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरक्राईम

श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला

श्रीरामपुर | प्रतिनिधी
श्रीरामपुर शहरात देशी बनावटीचे गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार चॉपर बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जर्मन हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या पाटाजवळ सायंकाळी सापळा रचला. तेथे दोन संशयित इसम जुपिटर मोपेडजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाझीम अन्वर पठाण (वय २५, रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपुर) आणि मोहमद जाफर खुदबक्ष पटेल (वय १८, रा. काझीबाबा रोड, श्रीरामपुर) अशी आहेत.
अंगझडतीदरम्यान नाझीम पठाण याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व मोबाईल जप्त करण्यात आला. तर मोहमद पटेल याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला.


प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे अग्निशस्त्र आणि काडतुसे शाहरुख पटेल (रा. संजयनगर, श्रीरामपुर) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली असून संबंधित संशयित सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी हे शस्त्र कोणाकडून आणले, त्यांचा नेमका उद्देश काय होता, तसेच ही हत्यारे कोणाला विक्रीसाठी आणली होती का याचा तपास सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button