Letest News
गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा
क्राईमशिर्डी

युट्युबवर जाहीर बदनामीचा आरोप! कोते यांच्या तक्रारीवरून शिर्डीत तीन पत्रकारांवर गुन्हे दाखल

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

युट्युब चॅनलच्या माध्यमातून खोटे, अपमानास्पद व समाजात प्रतिमा मलिन करणारे आरोप केल्याचा गंभीर आरोप दिगंबर हरिभाऊ कोते यांनी केला असून, त्या तक्रारीवरून ‘न्यूज मराठी’ युट्युब चॅनलच्या तीन प्रतिनिधींवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे दिगंबर कोते यांनी सांगितले.

‘फोटो दाखवून थेट गुन्हेगार ठरवले’ — कोते यांचा आरोप

DN SPORTS

दिगंबर कोते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास, संबंधित युट्युब चॅनलवरील प्रतिनिधींनी त्यांचा फोटो सार्वजनिकरित्या दाखवून आपण दहशत निर्माण करतो, लोकांना त्रास देतो, लोकांना ब्लॅकमेल करतो तसेच आपल्यावर 16 गुन्हे दाखल आहेत, असा खोटा, बिनबुडाचा व बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘४ हजार प्रेक्षकांपुढे अब्रूची चिरफाड झाली’

सदर व्हिडीओ बातमी ४,००० हून अधिक नागरिकांनी पाहिल्यामुळे आपली सामाजिक, कौटुंबिक व व्यावसायिक प्रतिष्ठा गंभीररीत्या बाधित झाल्याचे दिगंबर कोते यांनी नमूद केले.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चालवत असलेल्या व्यवसायावर याचा थेट परिणाम झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या तिघांविरोधात गुन्हा नोंद

दिगंबर कोते यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी खालील व्यक्तींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे —

kamlakar
🔴

 प्रदीप पाटील

🔴

 कुणाल जमधाडे

🔴

 जयेश सावंत
(पूर्ण नाव व पत्ता तपासाअंती निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.)

‘पत्रकारितेच्या नावाखाली मानसिक छळ’ — आरोप

युट्युब पत्रकारितेच्या आड खोटे आरोप करून मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप करत, न्याय मिळावा म्हणून कायदेशीर मार्ग स्वीकारला असल्याचे दिगंबर कोते यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू

या प्रकरणी शिर्डी पोलीस व्हिडीओ क्लिप, अपलोड वेळ, व्ह्यू काउंट, स्क्रिप्ट व सायबर पुरावे तपासत असून, पुढील कारवाई तपासानंतर होणार असल्याचे कोते यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button