Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा-एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
अ.नगरराजकीय

शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई

शिर्डीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी चाकूसारखे घातक शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन जणांविरोधात शिर्डी पोलिसांनी कडक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दि. 21 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजता साईश कॉर्नर परिसरात आरोपी निहाल हमराज काद्री (रा. बायजाबाईनगर) हा हातात धारदार चाकू घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करताना रंगेहाथ सापडला. या घटनेत संतोष ऊर्फ गोट्या जनार्धन पाटोळे (रा. वाघवस्ती) याने त्याला शस्त्र पुरवल्याचे उघड झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रकरणी पोका/2479 गौरव वसंत राऊत यांच्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 4/25 अन्वये गुन्हा रजिस्टर क्र. 195/2026 दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. 22 मार्च रोजी पहाटे 00:43 वाजता नोंदविण्यात आला.
⚡ पोलिसांची तत्काळ एंट्री – वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बल्लैया यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.


❗ शस्त्रासह दहशत – नागरिकांमध्ये भीतीचं सावट सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र बाळगून उघडपणे दहशत माजवण्याच्या प्रकारामुळे शिर्डीकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शहर सुरक्षित आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
🔥 आरोपी मोकाट; पोलिसांवर दबाव वाढला गंभीर बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिसांवर तात्काळ कारवाईचा दबाव वाढला आहे.


👉 पुढील तपास सुरू या प्रकरणाचा तपास पोना/2270 पंकज गोसावी करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलीस पथके सज्ज झाली आहेत.
⚠️ कायदा मोडणाऱ्यांना इशारा शिर्डीत कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहितीही मिळत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button