Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – सौ.ममता पिपाडा

[17:05, 19/2/2025] Gadkari: शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केले. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीयाचे दिलीपराव वाघमारे,मदनलाल पिपाडा,प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,महावीर पिपाडा,मदन तारगे,निखील पिपाडा,लिलाबाई पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.ममता पिपाडा पुढे म्हणाल्या की,ज्यांचे नाव घेताच शत्रुच्या पायाखालची वाळु घसरावी तसेच राज्य कसे चालवावे हा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण सर्वांनी जन्म घेतला हे आपले हे आपले भाग्य आहे. एका गर्जनेतुन दिल्लीचे सिंहासन हलविण्याची ताकद शिवरायांच्या आवाजात होती. अतिशय कल्पक बुद्धी,शत्रुशी दोनहाथ कऱण्यासाठी गणीमीकावे,शत्रुचे मनसुबे धुळीस मिळविण्यात निश्नात होते. रयतेला सोबत घेवुन सुराज्यातून स्वराज्याची संकल्पना मनात ठेवून परकिय आक्रमणातुन राज्याचे व रयतेचे संरक्षण करणारे एकमेव राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते.

sai nirman
जाहिरात

शिवरायांनी अवघे आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचले. मावळ्यांना सोबत घेवुन त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले. जिजाऊंच्या शुरविरांच्या गोष्टींतुन प्रेरना घेवुन अल्पवयात सर्वच कलांमध्ये पारंगत होवुन राज्याचे सुत्र हातात घेवुन उत्तम शासक बनले. त्यांच्या विचारांची, साहस व धाडसाची,बुद्धीची जयंती साजरी होणे खुप गरजेचे आहे. शिवरायांच्या काळात कुठल्याही राजाने लढाई जिंकली की त्या राज्यातील संपत्ती व स्त्रीयादेखील त्याच्या व्हायच्या. ही क्रूर प्रथा शिवरायांनी बंद केली. त्यांनी शत्रुंच्या स्त्रियांचादेखील आदर केला. त्यांना सुरक्षितता प्रदान केली. आज पावलोपावली महिलांवर अत्याचार, अन्याय होत आहे. जो तरूण शिवरायांना वाचेल, तो तरूण कधीही कुठल्याही परस्त्रीचा अनादर करणार नाही.

    यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button