Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक 

शिर्डी प्रतिनिधी दिनांक  १६/०२/२०२५ रोजी ०६.३० वा. सुमारास फिर्यादी नामे मोहित महेश पाटील, वय २५, रा. दिंडोली, ता.चौरीयासी, जि. सुरत, गुजरात हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपीतांनी इटिंगा कारने फिर्यादीस आडवून, त्यांना गन, गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता . याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२५ बीएनएस कलम ३१० (२), १२६ (२), ३५२, ३५१ आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रमीजराजा आत्तार, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशाचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.

दिनांक १९/०२/२०२५ रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा विजय गणपत जाधव, रा.श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह केला असून ते पांढरे रंगाची इटिंगा कारमधुन लासलगाव, जि. नाशिक येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत. पथकाने पंचाससमक्ष शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून बातमीतील वाहनास थांबवून, वाहन चालक व कारमधील इसमांना ताब्यात घेऊन, त्यांना नावे विचारली असता

त्यांनी त्यांचे नावे १) विजय गणपत जाधव, वय २९, रा. गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १, श्रीरामपूर, अहिल्यानगर २) सिध्दार्थ भाऊसाहेब कदम, वय २९, ३) राहुल संजय शिंगाडे, वय ३५ ४) सागर दिनकर भालेराव, वय ३० ५) समीर रामदास माळी, वय २६ ६) दोन विधीसंघर्षित बालक अ.क्र.२ ते ६ सर्व रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून

९,००,०००/- रू किं. पांढरे रंगाची इटिंगा कार क्रमांक एमएच-४१-व्ही-२८१७, ४५,०००/- रू किं. त्यात ३ मोबाईल, ११,०००/- रू किं. त्यात दोन एअर गण, ३,०००/- रू किं. ३ लोखंडी कत्ती, १,०००/- रू किं. एअर गण छर्रे असलेली डबी, ४,०००/- रू कि. त्यात पिवळया धातुच्या अंगठया व चैन असा एकुण ९,६४,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील जप्त करण्यात आलेल्या हत्याराने चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. पथकाने आरोपीकडे आणखी कोठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपीतांनी संगमनेर तालुका, घोटी, जि. नाशिक व वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे सांगीतलेल्या माहिती वरून खालीलप्रमाणे दरोडा व जबरी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

ताब्यातील इसमाकडे पंचासमक्ष गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयातील रोख रक्कम आपसामध्ये वाटुन घेतली असून सोन्या चांदीचे दागीने हे नाशिक येथील राजेंद्र बंधु यांना विक्री केले व त्यातुन आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटुन घेतली असल्याची माहिती सांगीतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button