Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
अ.नगरक्राईम

समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी

राहाता (प्रतिनिधी) : राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत कथित बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात तत्कालीन शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनाही अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
या प्रकरणात आधीच आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्यावर कारवाई सुरू असताना, त्या काळातील शाखेच्या कारभाराची जबाबदारी व्यवस्थापकांवर होती. त्यामुळे शाखेत उघडण्यात आलेल्या कथित बनावट खात्यांबाबत तसेच संबंधित कागदपत्रांच्या वापराबाबत तत्कालीन व्यवस्थापकांची भूमिकाही तपासली जावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


काही नागरिक व माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “प्राथमिक चौकशीवर वेळ न दवडता संबंधित जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पुरावे नष्ट होण्याची शक्यता टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
दरम्यान, या कथित गैरव्यवहारामुळे पतसंस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस व संबंधित तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button