Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
क्राईमशिर्डी

नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण

शिर्डी : हॉटेलमधील कौटुंबिक वादाला हिंसक वळण मिळाल्याची घटना शिर्डीत समोर आली आहे. हॉटेल पाम पॅलेसचे भागीदार अक्षय मुकेश लोकचंदानी यांना त्यांच्या मेव्हण्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा तसेच लोखंडी वस्तूने पाठीत, नाकावर व पायावर मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात मेव्हणा संतोष लखमीचंद नागवाणी व सासरे लखमीचंद नागवाणी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय लोकचंदानी यांचा विवाह २०१८ मध्ये योगीता यांच्यासोबत झाला आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नी मागील काही वर्षांपासून माहेरी राहत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पत्नीला पुन्हा नांदण्यासाठी आणण्याचे प्रयत्न करूनही ती येत नसल्याने दोघांमध्ये न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

DN SPORTS

kamlakar

मध्यरात्री हॉटेलबाहेर शिवीगाळ अन् धिंगाणा

दि. १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.०५ वाजता अक्षय लोकचंदानी हे हॉटेल पाम पॅलेस येथे रूमची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्री सुमारे १.०५ वाजता संतोष नागवाणी हा ज्युपिटर मोपेडवरून हॉटेलवर आला आणि बाहेरून अक्षय लोकचंदानी यांना शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे.

अक्षय यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतोष हा वाहनावरून खाली उतरून हॉटेलसमोर आला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मालकाला शिवीगाळ करू नका म्हणताच कर्मचाऱ्यालाही मारहाण

यावेळी हॉटेल कर्मचारी सूरज प्रल्हाद फड यांनी ‘मालकाला शिवीगाळ करू नका’ असे सांगितले. याचा राग आल्याने संतोष नागवाणी याने सूरजच्या तोंडावर हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अक्षय लोकचंदानी हे संतोषला समजावून सांगत असताना त्याने त्यांनाही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता खिशातील काहीतरी लोखंडी वस्तू काढून अक्षय यांच्या पाठीत, नाकावर आणि पायावर मारल्याने दुखापत झाली, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मारहाणीदरम्यान तोंडावर मार लागल्याने दातालाही दुखापत झाल्याचे अक्षय यांनी पोलिसांना सांगितले.

हॉटेल मालकाला बोलावले अन् प्रकरण पोलिसांत

घटनेनंतर अक्षय यांनी संतोष ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे मालक हरीष कालडा यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ते संतोषला घेऊन निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, अक्षय लोकचंदानी शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दवाखाना मेमो दिला. त्यांनी राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असतानाही शिवीगाळ

विशेष म्हणजे, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना सासरे लखमीचंद नागवाणी यांनीही शिवीगाळ केल्याचा आरोप अक्षय लोकचंदानी यांनी केला आहे.

या प्रकरणी अक्षय लोकचंदानी यांच्या फिर्यादीवरून संतोष लखमीचंद नागवाणी व लखमीचंद नागवाणी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कौटुंबिक वादातून सुरू झालेला हा प्रकार थेट हॉटेलसमोरच्या मारहाणीपर्यंत पोहोचल्याने शिर्डीत चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button