Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मोठे आवाहन; पाच व्यावसायिक स्टॉलचे लोकार्पण

शिर्डी, प्रतिनिधी : दिव्यांगांना स्वाभिमानाने जगता यावे, स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावे, या उद्देशाने शिर्डी येथे पाच दिव्यांग व्यावसायिक स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, यानिमित्त आयोजित दिव्यांग संवाद कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कांबाबत प्रभावी भूमिका मांडली.

sai nirman
जाहिरात

यावेळी बोलताना आ. बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगांना केवळ शासकीय मदत किंवा अनुदान देऊन चालणार नाही, तर त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे. प्रत्येक शहरात दिव्यांगांसाठी राखीव व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था झाली, तर हजारो दिव्यांग कुटुंबांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मिळू शकतो. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. बच्चू कडू यांनी शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या देवस्थानाच्या ठिकाणी दिव्यांगांना व्यावसायिक स्टॉलचा हक्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. खा. सुजय दादा विखे पाटील, यांच्या दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच शिर्डी परिषदेचे नगराध्यक्ष, जयश्रीताई थोरात , उपनगराध्यक्ष, श्री अभय भय्या शेळके पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण कोते पाटील, सतीश नंदू भाऊ गोंदकर नगरसेवक, नगरसेवक रवी तात्या गोंदकर, अमित दादा शेळके नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ सोनवणे, नितीन पाराजी कोते नगरसेवक ) संदीप भाऊ सोनवणे ( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टी )सर्व नगरसेवक आणि संबंधित प्रशासनाने विशेष लक्ष घालून दिव्यांगांसाठी हे स्टॉल उभे करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

DN SPORTS

या उपक्रमामुळे दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार आहे. शिर्डी येथे सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य सचिव सुरेश मोकल साहेब , महिला जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई देशमुख , जिल्हाध्यक्ष घाडगे, लक्ष्मण पोकळे, तालुका सचिव सुरेश गुगळे, (प्रहार दिव्यांग क्रांती शहर अध्यक्ष) कैलास यादगुडे, उपाध्यक्ष,गौतम घणगाव, शहर उपाध्यक्ष खुशाल पठाण, शहर सचिव ताहीर सय्यद, विखे ताई, नवनाथ पुंड, पत्रकार,राजू भाऊ जाधव, शोभाताई बाणाईत, चंद्रशेकर रॉय, शांताराम भाऊ, नानासाहेब शिरसाट, सुनील आरणे, चांद पाशा भाई, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, विनोदसिंग परदेशी, तसेच प्रहार युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. पांडुरंग औताडे, बाळासाहेब खर्जुले आप्पासाहेब ढुस नेवासा तालुका प्रमुख जालिंदर आरगडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी शहर, राहाता तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते . कार्यक्रमास जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव-भगिनी, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button