Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
क्राईमशिर्डी

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा धडाका माजी नगराध्यक्षांसह अनेकांना नोटिसा

शिर्डीतील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाचा फास आणखी आवळला गेला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या जबाबाच्या आधारे शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच काही प्रतिष्ठित माजी नगरसेवकांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दोन माजी नगराध्यक्षांनी SIT समोर हजर राहून आपले जबाब नोंदविले असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
बनावट खात्यांचा मोठा स्फोट; आणखी गुन्हा दाखल
खरातने पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट खाती उघडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात त्याच्यासह संबंधित पतसंस्थांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात तब्बल 130 बनावट खाती उघडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तीर्थयात्रेच्या नावाखाली कागदपत्रांची फसवणूक
या प्रकरणात 19 खातेदारांनी पोलिसांकडे लेखी जबाब देत, “आमच्या नावाने खाते उघडल्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही,” असे स्पष्ट केले आहे. तीर्थयात्रेच्या सहलीचे आमिष दाखवून आधार, पॅन कार्ड व फोटो घेतले आणि त्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस कोठडीतून उघड झाले मोठे रहस्य
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अरविंद बावके व किरण सोनवणे यांची पोलीस कोठडी सोमवारी संपत असून, चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बावके यानेच अनेक खात्यांवर बनावट सह्या करून खाते उघडण्यात मदत केल्याचे उघड झाले आहे.


100 खात्यांवर स्वतःच वारसदार; मोबाईल लिंक करून पैशांची अफरातफर
शहरातील एका पतसंस्थेत 57 लोकांच्या नावावर 100 बनावट खाती उघडून त्यावर स्वतःला वारसदार दाखवण्यात आले. या खात्यांशी स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मालमत्ता आणि राजकीय कनेक्शनचीही चौकशी
खरातचा शिर्डीत मोठा भक्तपरिवार असून, अनेक मालमत्तांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.


एसआयटीच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
SITच्या या कारवाईमुळे शिर्डी-राहाता परिसरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button