Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरक्राईम

अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

अहिल्यानगर :
राहुरी–राहाता परिसरात भीतीचे सावट निर्माण करणारी अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या अत्यंत शिताफीने व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने जेरबंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

sai nirman
जाहिरात

घटना कशी घडली? – फिर्यादीस वाहनातून उचलून निर्जन गोडाऊनमध्ये नेले

फिर्यादी बापुसाहेब रामदास गागरे (वय 39) रा. तांभोरे, ता. राहुरी हे दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी वाकडी (ता. राहाता) येथे जात असताना, एका पांढऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.
निळवंडे कॅनलजवळ आरोपींनी हत्याराचा धाक दाखवत फिर्यादीला गाडीतून खाली उतरवून जिवे मारण्याची धमकी दिली.

DN SPORTS

यानंतर त्यांना जबरदस्तीने त्यांच्या वाहनात बसवून एका निर्जन गोडाऊनमध्ये नेण्यात आले. तेथे मारहाण करीत आरोपींनी दहा लाखांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देतो असे सांगताच, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला शनिशिंगणापूर फाट्याजवळ सोडून देण्यात आले.

यानंतरही आरोपी सतत फोन करून
“पैसे दिले नाहीत तर तुला आणि तुझ्या परिवाराला ठार करू”
अशी धमकी देत राहिले.

याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये
गु.र.नं. 1163/2025
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम
140(2), 308(3)(4)(5), 115(2), 351(2), 352, 3(5)
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


स्थानिक गुन्हे शाखेची मोहीम — पुण्यातून टोळीला उचलले

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी
पोउपनि संदीप मुरकुटे, अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला अंमलदार सोनाली भागवत व चालक अरुण मोरे
यांचे पथक तयार केले.

kamlakar

तांत्रिक विश्लेषण, कॉल ट्रेसिंग व व्यावसायिक तपासकौशल्याचा वापर करत पथकाला माहिती मिळाली की आरोपी
कोथरूड, पुणे येथे असल्याची खात्री झाली.

पथक तत्काळ पुणे येथे रवाना झाले आणि सापळा रचून आरोपींना पकडण्यात यश आले.


जेरबंद आरोपी

  1. ओम अशोक ठोंबरे (20 वर्षे)
    रा. सुतारदरा, ता. हवेली, पुणे
    मूळ रा. देवगाव, ता. नेवासा
  2. अजय शंकर हुलावळे (21 वर्षे)
    रा. सुतारदरा, ता. हवेली, पुणे
  3. सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे (19 वर्षे)
    रा. तांभोरे, ता. राहुरी
  4. साई परमेश्वर ढवळे (18 वर्षे)
    रा. भेंडा, ता. नेवासा

चौकशीत हुलावळे याने हे संपूर्ण अपहरण प्रकरण
5) रामेश्वर उर्फ राया (फरार)
6) रोहित रुईकर (फरार)
यांच्यासह रचल्याची कबुली दिली.


मुद्देमाल जप्त

आरोपींच्या कबुलीनंतर पथकाने
₹1,19,200/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पुढील तपास

ताब्यातील सर्व आरोपींना राहुरी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही धडाकेबाज कारवाई
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे
यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button