Letest News
शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो...
Blog

लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, केसरकर

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र तरीही आंदोलनं का केली जातात, दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत का ? असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. यावेळी दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती.

sai nirman
जाहिरात

त्यावर मंत्री दीपक केसरकर म्हणाले, कर्नाटक, तेलंगाणामध्ये ईव्हीएम मशीन नव्हते का? असा सवाल उपस्थित करत ‘नाचता येईना अंगण वाकडं’ आहे. तेलंगणातील विजय तुम्हाला चालतो, मग भाजपा जिकंलं की तिथं ईव्हीएम मशीन दिसतं. हे भित्यापोटी ब्रम्हराक्षस असं झालं आहे. अदानी तुमच्याकडं आले की चालतात. दुसरीकडं गेले की चालत नाहीत. धारावीमधील लोकांकडं आस्थेनं बघा.त्यांना जो कुणी घर देईल ते पुण्याचं काम असेल धारावीतील लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, असा टोला मंत्री केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button