Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
क्राईमशिर्डी

शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ!

शिर्डी, दि. २९ : साईनगरी शिर्डीतील एका प्रसिद्ध चिन्नारावच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाच्या ताटात झुरळ आढळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा फोटो आणि संबंधित तक्रार समोर आल्यानंतर शिर्डीतील हॉटेल व्यवसायातील अन्नस्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित व्यक्ती जेवणासाठी चिन्नारावच्या हॉटेलमध्ये गेली असता जेवण करत असताना पदार्थामध्ये झुरळ आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेचे छायाचित्रही तक्रारीसोबत जोडण्यात आले असून, हा प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


चिन्नारावच्या हॉटेल प्रशासनाकडे तक्रार; मात्र समाधानकारक उत्तर नसल्याचा आरोप
या प्रकारानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली नाही तसेच समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ग्राहकांनी पैसे मोजून सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवायची; मात्र प्रसिद्ध हॉटेलमध्येच अशा प्रकारे पदार्थामध्ये झुरळ आढळत असेल, तर “हॉटेलच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेचे नेमके काय चालले आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
अन्न सुरक्षा विभागाने अचानक तपासणी करावी!


या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासावी तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्नाशी संबंधित तक्रारींसाठी FSSAI कडे अधिकृत तक्रार नोंदविण्याची व्यवस्था असून, ग्राहकांना संबंधित पुरावे व छायाचित्रे जोडण्यात आलेली आहेत


साईनगरीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ नको!

शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येत असतात. त्यामुळे येथील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्नस्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसिद्धी आणि गर्दीच्या जोरावर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ताटात झुरळ, प्रशासनाचे लक्ष कधी?
प्रसिद्ध हॉटेलमध्ये ग्राहकाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे. संबंधित फोटो आणि तक्रारीची अन्न सुरक्षा विभागाने गंभीर दखल घेऊन हॉटेलची अचानक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button