Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

नियोजित शिर्डी-नाशिक रेल्वेमार्गासाठी निमगाव-कोऱ्हाळे परिसरातील जमिनी जाणार शेतकऱ्यांनी वेळीच हरकती नोंदवाव्यात – विजय कातोरे

शिर्डी : नियोजित शिर्डी-नाशिक रेल्वेमार्ग निमगाव-कोऱ्हाळे परिसरातून जाणार असून, या रेल्वे मार्गासंदर्भातील राजपत्र व पेपर नोटीस प्रसिद्ध झाल्याने ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत, त्यांनी वेळीच सावध होऊन आपल्या हरकती नोंदविण्याचे आवाहन माजी उपसरपंच विजय कातोरे यांनी केले आहे.
रेल्वेमार्गासाठी जमीन संपादित होत असताना भविष्यात शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केवळ जमिनीचा मोबदला हा विषय नसून, शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाण्या-येण्याचा मार्ग, सध्याचे रस्ते व रहदारी सुरू ठेवणे, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी सायफनची व्यवस्था, आवश्यक ठिकाणी ओव्हरब्रिज अथवा भुयारी मार्ग, रेल्वेमार्गामुळे जमिनीचे तुकडे झाल्यास त्यांच्याकडे जाण्या-येण्यासाठी सर्व्हिस रोड अशा विविध बाबींचा विचार करून हरकती घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे कातोरे यांनी म्हटले आहे.
जमीन संपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना सरकारी किंमतीच्या चारपट योग्य मोबदला मिळावा, तसेच कोणत्याही शेतकऱ्याची शेती रेल्वेमार्गामुळे कायमस्वरूपी अडचणीत येणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यासंदर्भात निमगाव-कोऱ्हाळे परिसरातील सर्व बाधित शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन सविस्तर चर्चा करावी आणि सामूहिकपणे आपल्या हरकती मा. प्रांताधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन विजय कातोरे यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी शिर्डी-पुणतांबा रेल्वेमार्गाचा संदर्भ देत सांगितले की, त्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे काही अनुभव समाधानकारक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा, आताच जागरूक होऊन आपले हक्क आणि भविष्यातील अडचणी याबाबत स्पष्ट हरकती नोंदविणे गरजेचे आहे.
“वेळ निघून गेल्यावर हरकत घेऊन उपयोग होत नाही. त्यामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी वेळीच भूमिका मांडली पाहिजे,” असे विजय कातोरे यांनी म्हटले आहे.


: शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
जमिनीच्या सरकारी किमतीच्या चारपट योग्य मोबदला
पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी सायफनची व्यवस्था
सध्याचे रस्ते व रहदारी सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी ओव्हरब्रिज
नागरिक व शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग
रेल्वेमार्गामुळे जमिनीचे तुकडे झाल्यास शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व्हिस रोड
शेतकऱ्यांच्या भविष्यातील शेती व वाहतुकीच्या अडचणींचा विचार करून सर्वसमावेशक नियोजन

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button