Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
खेळशिर्डी

निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष

शिर्डी : सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या क्रांती युवक मंडळ व सन्मित्र युवक मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ठीक ४ वाजता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, गोविंदांच्या जल्लोषाने परिसर दुमदुमणार आहे.

sai nirman
जाहिरात

“गोविंदा आला रे आला… गोविंदा रे गोपाळा…”च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि एकतेच्या उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

१९९२ पासून सामाजिक-सांस्कृतिक कार्याची अखंड वाटचाल

DN SPORTS

दि. ९ ऑगस्ट १९९२ रोजी स्थापना झालेल्या क्रांती युवक मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिर्डी शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाबरोबरच आगामी गोपाळकाला व गणेशोत्सवासाठी मंडळाची जय्यत तयारी सुरू आहे.

मंडळाची विशेष ओळख म्हणजे निर्व्यसनी आणि संघटित तरुणाईची फळी. व्यसनांपासून दूर राहून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या तरुणाईला विधायक दिशा देण्याचे काम मंडळ सातत्याने करीत आहे.

kamlakar

ढोल-ताशांच्या निनादाने शिर्डीच्या उत्सवांना नवी ऊर्जा

क्रांती युवक मंडळाचे ढोल-ताशा पथक हे शिर्डी परिसरातील विशेष आकर्षण ठरले आहे. मंडळातील तरुण-तरुणी उत्साहाने ढोल-ताशे वाजवत असून, दहीहंडी, गणेशोत्सव, हनुमान जन्मोत्सव, रंगोत्सव यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये या पथकाचा निनाद उत्साहाचे वातावरण निर्माण करतो.

तरुणाईचा जोश, पारंपरिक वाद्यांची साथ आणि शिस्तबद्ध सादरीकरण यामुळे मंडळाच्या ढोल-ताशा पथकाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

उत्सवांसोबत सामाजिक बांधिलकीही कायम

क्रांती युवक मंडळाच्या वतीने वर्षभर पतंग उत्सव, रंगोत्सव, हनुमान जन्मोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दहीहंडी, गणेशोत्सव, दीपोत्सव यांसारखे विविध उत्सव साजरे केले जातात. यासोबतच साई रथ सेवा, रक्तदान शिबिरे, गड-किल्ले ट्रेकिंग, एकता सेवा अशा सामाजिक व विधायक उपक्रमांतही मंडळाचा सक्रिय सहभाग असतो.

उत्सवांच्या माध्यमातून समाजातील एकोपा वाढविणे, तरुणाईला एकत्र आणणे आणि सामाजिक कार्याची जाणीव निर्माण करणे, हा मंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.

मंडळाच्या या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीला भाजप नेते तथा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त आणि क्रांती युवक संघटनेचे संस्थापक सचिन तांबे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील तरुणाई विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे.

“जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र” या विचारातून सामाजिक एकता, तरुणाईचा सकारात्मक सहभाग आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर करण्याचा संकल्प मंडळाने कायम जपला आहे.

गोविंदांच्या उत्साहाला नागरिकांनी द्यावी नवी ऊर्जा!

दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाला शिर्डीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदांच्या उत्साहाला नवी ऊर्जा द्यावी, असे आवाहन क्रांती युवक मंडळ व सन्मित्र युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button