Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री साईबाबा समाधी मंदिरात कृष्णजन्म कीर्तन, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. राजेंद्र पांडुरंग मांडेवाल, सानपाडा, नवी मुंबई यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन झाले. कीर्तनातून श्रीकृष्ण जन्माची कथा आणि भक्तीचा संदेश उपस्थित भाविकांसमोर मांडण्यात आला. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर श्रींची शेजारती संपन्न झाली.
या सोहळ्यास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी, कर्मचारी आणि साईभक्त राजेंद्र सुभाष कोते (मानकरी) अमोल गायके मुरली गायके अभीराज कोते चेतन कोते वैभव कोते उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तात्या पाटील कोते यांच्या वंशजांच्या हस्ते दहीहंडी
आज सकाळी १० ते १२ या वेळेत श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर ह.भ.प. श्री. राजेंद्र पांडुरंग मांडेवाल यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज परिवारातील सदस्य श्री. अजित प्रकाश कोते यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली.
दहीहंडी फुटताच उपस्थित साईभक्तांनी जल्लोष करीत ‘गोविंदा गोपाळा, जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून टाकला. या सोहळ्यामुळे शिर्डीतील गोकुळाष्टमीच्या पारंपरिक भक्तिमय वातावरणाला आणखी रंगत आली.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडत असून, कृष्णजन्माच्या मंगल सोहळ्याने शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button