दिल्लीच्या साईभक्त योगेश शर्मा यांची ३ लाख २७ हजारांची भक्तीमय देणगी; २२ ग्रॅम ९४० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक ब्रोच अर्पण
शिर्डी : श्री साईबाबांच्या चरणी देशभरातील साईभक्तांकडून श्रद्धेने विविध स्वरूपात देणगी अर्पण केली जाते. गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथील साईभक्त योगेश शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा आकर्षक ब्रोच अर्पण केला.

या सोन्याच्या ब्रोचचे वजन २२ ग्रॅम ९४० मिलीग्रॅम असून, त्याची देणगी मूल्य ३ लाख २७ हजार २१६ रुपये इतके आहे. आकर्षक नक्षीकाम केलेला हा सोन्याचा ब्रोच साईचरणी अर्पण करताना योगेश शर्मा यांनी साईबाबांप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली.
देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्त योगेश शर्मा यांचा सत्कार केला.
गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी अर्पण करण्यात आलेल्या या सोन्याच्या देणगीमुळे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.