शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साईनगरीत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे शिर्डीत हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेना, महिला आघाडी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली. शिर्डी शहरात ठिकठिकाणी स्वागत फलक, बॅनर व घोषणाबाजीमुळे शिवसेनामय वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध असून, आगामी राजकीय वाटचालीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
“शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांचे शिर्डी साईनगरीत मनःपूर्वक स्वागत असून, त्यांच्या मार्गदर्शनातून पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळेल.” – तालुका प्रमुख भरत मोरे व शिवसेना पदाधिकारी, कोपरगाव तालुका.

