Letest News
ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार
राजकीयशिर्डी

shirdi news: साईंची नगरी का बनत आहे मोहमाया नगरी अनेक कर्मचारी बनलेय मोहमायेचे प्यादे

साईंची नगरी का बनत आहे मोहमाया नगरी अनेक कर्मचारी बनलेय मोहमायेचे प्यादे

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी हीच नगरी आहे कि जी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी येथे साईबाबांचे संपूर्ण हयात येथेच गेले. बाबांच्या देहवासानंतर शिर्डीत साईसमाधी मंदिर उभं राहिलं, हळू हळू बाबांच्या चमत्कारांची, लिलेची माहिती लोक जाणून घेऊ लागले आणि याभूमीत एक अशी ऊर्जा आहे कि ती बाबांच्या रूपाने भाविकांना मदत करते आणि याचा प्रत्येय तथा साक्षात्कार अनेकांना आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

आणि यातूनच बाबांवर अनेक भक्तांची श्रद्धा जडली आहे, श्रद्धेपोटी अनेकांनी सोने, चांदी, हिरे, जव्हारात, रोकड तसेच अनेक स्वरूपात देणगी देण्याची प्रथा सुरु झाली आणि त्यातूनच आज आमच्या बाबांचे मंदिर सुवर्णमय होऊन चमकू लागले. मात्र या मंदिरावर साई संस्थांनची देखभाल तसेच भाविकांच्या देखभालीचीही जबाबदारी आली, भक्तांचे समाधानपूर्वक दर्शन,सुरक्षा,राहण्याची व खाण्याची अल्पदरात सुविधाही संस्थांनने निर्माण केल्यामुळे आणि बाबांचा प्रचार आणि प्रसारामुळे  काही कालावधीतच आपल्या शिर्डीचे नाव सात समुद्रा पलीकडे जाऊन पोहचले,

kamlakar

तर विदेशातूनही भक्तांचा ओघ सुरु झाला आणि आमच्या शिर्डीच्या अर्थाकारनाला आधार झाला म्हणूनच आम्ही शिर्डी ग्रामस्थ आजही अतिथी देवो भव ! अर्थात भाविकांना साईबाबांच्या रूपात पाहून सेवा देत आहोत. अखेर याला अपवाद ठरले ते संस्थांनमधील काही कर्मचारी, अधिकारी! त्यांच्या ओळखी थेट श्रीमंत भाविक तथा अधिकारी, मंत्री, विदेशी भाविक यांच्याशी होऊ लागल्या आणि तेथूनच उगम सुरु झाला तो मोहमायेचा, अर्थात भाविकांना दिले जाणारे झटपट दर्शन, व्हीआयपी सुविधा हे काही कर्मचारी देऊ लागले

आणि त्यांनी संस्थांनचा, बाबांचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून भाविकाकडून गिफ्ट, रोकड, खोटं सांगून मदतीचा बहाना, देशविदेशातील विमानाच्या सफरी, पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा, गोवा, मसुरी, दिल्ली, हेंद्राबाद पासून ते देशभरातील अनेक ठिकाणच्या शहरात हे कर्मचारी विमानाने भाविकांच्या पैशातून मौजमजा करत असल्याचा पायंडा सुरु झाला.

यात काही कर्मचाऱ्यांनी थेट अधिकारी यांनाही विमानवारी घडउन आणली तर काही स्वार्थी कर्मचाऱ्यांनी भोळ्या भाळ्या भाविकांकडून लाखो रुपये उकळल्याच्याही घटना सामोरं आल्या आहेत,त्या तपासण्याऐवजी संस्थांनने चुप्पी ठेवली आहे. त्यामुळेच शंकेची दरी वाढली आहे अर्थात याचं उगमस्थान जनसंपर्क कार्यालय, सुरक्षा यंत्रणा आणि इतरही असले तरी या सुरु असलेल्या मोहमायेवर साई संस्थांनचा कंट्रोल नाही

तर दुसरीकडे कुणावरही कारवाई होत नसल्याने ह्या स्वार्थी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत असून याचं रूपांतर रॅकेट मध्ये झालं असून अनेकजन मोहमाया कमवत आहे. याविषयी प्रसारमाध्यमामध्ये बातम्याही झळकल्यातर कधी भाविकांनीही तक्रारी केल्या परंतु ह्या रॅकेटवर कुठलाही परिणाम झाला नाही, या गोष्टीचं गांभीर्य संस्थांनला नाही मात्र काही प्रकरणामुळे शिर्डीचे व संस्थांनचे नाव बदनाम होत आहे

अशा जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबन अथवा पोलीस केस करावी असेही ग्रामस्थ यांची मागणी आहे. कारण यांच्यामुळेच शिर्डीच नाव बदनाम होत असून यापुढे शिर्डी ग्रामस्थ हा सुरु असलेला मोहमायेचा बाजार यावर कायस्वरूपी पायबंद आणतील हीच माफक अपेक्षा कारण भक्ताला लूटलं, फसवलं तर ते बाबांना फसवील्यासारखं आहे हे समजलं तरी पुष्कळ !!!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button