Letest News
विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा...
अ.नगरराजकीय

कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अर्ज माघारी संदर्भात निर्णय घेऊ-!-डॉक्टर राजेंद्र पिपाडा

शिर्डी( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत बोलवले होते, मुंबईत आपण गेल्यानंतर पक्षातील व मतदार संघातील अडीअडचणी पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्या. व उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करू, व मगच काय तो निर्णय घेऊ !असे आपण पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे शिर्डीतील अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी दैनिक साई दर्शनशी बोलताना सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने भाजपाचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिर्डी मतदार संघामध्ये आपणाला उमेदवारी द्यावी. अशी मागणी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वी केली होती. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी बैलगाडीत येऊन हा अर्ज राहाता येथे दाखल केला होता.

त्याची चर्चाही मोठी झाली होती. डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षश्रेष्ठींमध्ये याविषयी माहिती मिळताच पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यासाठी चार्टर्ड विमानही पाठवले असल्याचे समजते. या चार्टर्ड विमानाने डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे तातडीने मुंबईला गेले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. पक्षातील व मतदार संघातील अडीअडचणी पिपाडा यांनी पक्षासमोर मांडल्या.

उमेदवारी अर्ज दाखल केल्याची कारणेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे समजते. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे आपली भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय ठरवतात? याकडे आता भाजपा बरोबरच शिर्डी मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. व तशी चर्चा ऐकू येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button