Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरक्राईम

राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात!

राहता : साधूंच्या वेषात येऊन एका महिलेची फसवणूक व लुटमार केल्याच्या घटनेने काल राहता परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेच्या अवघ्या २४ तासांच्या आत राहता पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
घटना घडल्यानंतर राहता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांच्या पथकाने चारही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे राहता पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, राहता तालुक्यात गुन्हा करून कोणालाही कायद्याच्या हातातून सुटका मिळणार नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राहता-शिर्डी परिसर हा धार्मिक व अध्यात्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे देशभरातून साधू, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने येत असतात. अशा परिस्थितीत साधूंच्या वेषाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
महिलेला लुटल्याच्या गंभीर घटनेनंतर अवघ्या २४ तासांत चार आरोपींना ताब्यात घेऊन राहता पोलिसांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राहाता शहरातील डॉ. मॅड हॉस्पिटलसमोर नगर-मनमाड रोडलगत असलेल्या साईदर्शन कॉम्प्लेक्समधील ईशिका गिफ्ट गॅलरी या दुकानात दोन अज्ञात साधू आले. त्यांनी दुकानातील महिलेला संमोहित करून तिच्याजवळील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून नागरिकांनी अनोळखी साधू अथवा संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन स्वाभिमानी व्यापारी संघटना, राहाता यांच्या वतीने करण्यात आले आहे.
🚨 नागरिकांनी सतर्क राहावे; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

🚨 राहता पोलिसांची दमदार कारवाई 🚨
काल महिलेला लुटले, आज चारही आरोपी ताब्यात!
साधूंच्या वेषात येऊन महिलेला फसवून लुटल्याच्या घटनेनंतर राहता पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतल्याने नागरिकांमधून राहता पोलिसांचे कौतुक होत आहे.
गुन्हा कितीही शिताफीने केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
राहता पोलिसांच्या तत्परतेला सलाम! 👮‍♂️👏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button