Letest News
NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी
क्राईमशिर्डी

साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून चोरांनी दिली बगीच्यात हिरवीगार सलामी..!

shirdi news

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या 200 रूम गार्डन मधून रात्रीच्या वेळी चक्क चंदनाचे झाड कापून गाभा चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही साईबाबा संस्थानच्या विविध विभागांमध्ये चोरीचे प्रकार घडल्याच्या घटना घडल्या आहेत. मग त्यात विद्युत विभागाच्या भांडार गृहातून विद्युत वस्तूंची चोरी असो वा देणगी काऊंटर वरील पावत्यांची अफरातफर करून पैशांची झालेली चोरी असो तसेच काही दिवसांपूर्वी साई नगर येथील इमारती मागील टेलिफोन च्या वायर चोरून नेण्याचा एक नव्हे दोनदा प्रकार घडल्याने साईबाबा संस्थानच्या वस्तू सुरक्षित कधी होणार हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


सदर चोरीची घटना ही गेल्या रविवारची असून रात्रीच्या वेळी 200 रूमचे गार्डन बंद असते. मात्र त्या परिसराची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. असे असताना सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवत चोरट्यांनी चंदनाचे झाड सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून अंधाराचा फायदा घेत कापून नेल्याने याबाबत मोठी चर्चा शिर्डीत होत आहे.याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून 10 हजार रुपये किमंतीचे चंदन झाड चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 1048/2023 भारतीय दंड संहिता 1860 नुसार 379 कलमान्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.


kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button