आज भल्या पहाटी पिंपळवाडी रोड लगत भाजी बाजार समोर काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे गर्दुल्यांनी हॉटेल मध्ये काम करणाऱ्या मुलास अडवून त्यास कोयत्याने धाक दाखवीत त्याच्याकडील मोबाईल पैशे आणि चांदीची चैन हिसकावली होती त्यानंतर फिर्यादीने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांचे दोन पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केले होते त्या गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात शिर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय सागर काळे यांच्या पथकाला यश आले आहे सचिन वर्पे राहणार बाजारतळ व शफिक पठाण राहणार बाजारतळ असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत परंतु यातील मुख्य आरोपी मात्र आजून हाती लागलेला नाही मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून शिर्डी पोलीस स्टेशन सह अनेक ठिकाणी त्यावर दखलपात्र गुहे दाखल आहेत त्यासही लवकर ताब्यात घेतले जाईल असे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले
जाहिरात
DN SPORTS