Letest News
समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग
Blog

शिर्डीत साईभक्त आतंकवादी आहेत का संजय शिंदे आक्रमक भक्तांची सुरक्षेच्या कारणाने वाहतुक वळवली आहे _येसेकर

साई भक्त गुन्हेगार आहेत का?”
शिर्डीत पोलीस दडपशाही; भाविकांची उघड हेळसांड**
शिर्डी | प्रतिनिधी
साईंच्या नगरीतच साई भक्तांना दुय्यम वागणूक दिली जात आहे का?
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली अरेरावी, वाहन काढण्याची सक्ती व अडवणूक यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
“शिर्डीत साई भक्त नकोतच, अशीच पोलीस प्रशासनाची मानसिकता दिसते,” असा स्फोटक आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे यांनी केला आहे.
शिर्डी पोलीस स्टेशन समोर लक्ष्मी नगर परिसरात भाविकांची वाहने जबरदस्तीने हटवली जात असून, कोणताही ठोस पर्याय न देता भक्तांना तासन्तास फिरवले जात असल्याचा आरोप आहे.
“वाहनात येणारे साई भक्त आतंकवादी नाहीत; ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले श्रद्धाळू आहेत,” असे संतप्त शब्दांत संजय अप्पा शिंदे म्हणाले.
पोलीसांना मनमानी अधिकार कोणी दिले?
वाहतूक शाखेकडून थेट कारवाई करत भाविकांची वाहने उचलली जात असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकतर्फी निर्णय घेऊन साई भक्तांना वेठीस धरण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला कोणी दिले? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
आर्थिक कणा मोडतोय; तरीही प्रशासन बधिर
आधीच शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना, साई भक्तांनाच अडवण्याचे धोरण राबवले जात असल्याने हॉटेल, लॉजिंग, व्यापारी, छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
अशा परिस्थितीत भाविकच येऊ दिले नाहीत तर शिर्डी कशी चालणार? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पालकमंत्री गप्प का?
साईंच्या नगरीत भक्तांवर अन्याय होत असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मौन बाळगून का आहेत?
की प्रशासनाच्या या दडपशाहीला राजकीय मूकसंमती आहे? असा संशय व्यक्त होत आहे.
वाहतूक विभागाची बाजू : सुरक्षिततेचे कारण
या आरोपांबाबत वाहतूक शाखेचे प्रमुख येसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
“नगर–मनमाड रोडवरील गेट नंबर ७ येथे प्रचंड गर्दी होत आहे. साई भक्तांच्या वाहनांना किंवा जीविताला कुठलीही इजा होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच वाहतूक शिर्डी बायपास रिंग रोडवर वळवण्यात आली आहे.”
सुरक्षिततेच्या नावाखाली दडपशाही नको – शिवसेनेचा इशारा
वाहतूक नियंत्रण गरजेचे असले तरी भाविकांची हेळसांड, अरेरावी व अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे यांनी दिला आहे.
जर तात्काळ निर्णय बदलले नाहीत, तर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button