Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप

राहता : अप्पर जिल्हा न्यायाधीश म्हणून आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रभावी कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे न्यायाधीश राजेश गुप्ता साहेब यांची बदली झाल्याने राहता तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या बदलीनिमित्त राहता बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांच्या संचालकांनी त्यांचा सन्मान करून भावपूर्ण निरोप दिला.
गुप्ता साहेबांनी आपल्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेतील शिस्त, पारदर्शकता आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यामुळे न्यायालयीन क्षेत्रात एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. न्यायदान करताना कोणताही दबाव न स्वीकारता त्यांनी नेहमीच न्यायाच्या तत्त्वांना प्राधान्य दिले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा आणि अध्यात्माची सुंदर जोड होती. ते निस्सीम साईभक्त होते. शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येताना कोणताही बडेजाव न करता ते सामान्य साईभक्तांप्रमाणे शांतपणे दर्शन घेत असत. त्यांच्या या साधेपणाने अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.
आज त्यांच्या बदलीमुळे राहता न्यायालय परिसरातील एक आदर्श अधिकारी नव्या जबाबदारीसाठी रवाना होत आहे. मात्र त्यांनी दिलेली शिस्त, कार्यतत्परता आणि न्यायनिष्ठेचा वारसा कायम स्मरणात राहील. न्यायासनावरील त्यांचा दरारा आणि साईचरणी असलेली त्यांची नितांत श्रद्धा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


राहता बार असोसिएशनच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना, “अशा कर्तव्यदक्ष आणि सुसंस्कृत अधिकाऱ्यांची उणीव कायम जाणवत राहील,” अशा भावना व्यक्त केल्या.राहता बार असोसिएशनतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यास अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये खर्डे, बेंद्रे, नागरे, आसने, बोर्डे, सौ. स्मिता देशमुख, दंडवते, धीवर, एस. पी. चौधरी, अनिल शेजवळ, अविनाश शेजवळ आदी मान्यवरांचा समावेश होता. उपस्थितांनी न्यायाधीश राजेश गुप्ता साहेब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या न्यायनिष्ठ, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button