Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी!

शिर्डी : प्रतिनिधी
‘ॐ साई राम’च्या जयघोषात साईभक्तांना काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ व मनोकामना मंदिर दर्शनाची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मार्गदर्शक मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी ग्रामस्थांच्या आयोजनातून ‘श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६ (संकल्पपूर्ती)’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत श्री क्षेत्र काशी, अयोध्या, नेपाळमधील श्री पशुपतीनाथ, गोरखपुर आणि मनोकामना मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल २५ हजार साईभक्तांनी १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेत सहभाग घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्पेशल रेल्वेने होणार धार्मिक प्रवास
यात्रेसाठी शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने प्रवास होणार आहे. वाराणसी येथे आगमनानंतर गंगा आरतीचा अनुभव, त्यानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढी व राजदरबार आदींचे दर्शन घेण्यात येणार आहे. साईभजन संध्येनंतर रेल्वेने पुढील प्रवास केला जाणार आहे.
यानंतर नेपाळकडे प्रयाण करून काठमांडू येथे मुक्काम, श्री पशुपतीनाथ व गोरखपुर दर्शन, भजन संध्या तसेच काठमांडू दर्शनाचा कार्यक्रम आहे. पुढे मनोकामना मंदिर येथे दर्शन घेऊन नौतनवा येथे आगमन व तेथून विशेष रेल्वेने शिर्डीकडे परतीचा प्रवास होणार आहे.


१४०० साईभक्तांचे बुकिंग; आता केवळ १०० जागा शिल्लक!
या विशेष तीर्थयात्रेसाठी आतापर्यंत १,४०० साईभक्तांनी बुकिंग केले असून आता केवळ १०० जागा शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे इच्छुक साईभक्तांनी विलंब न करता आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट शिर्डी साईनगर रेल्वे स्थानक वरुण दुपारी 2 वाजता निघणार आहे तेव्हा सर्वांनी सप्तपदी लॉन्स येथे जमावे
प्रवास शुल्क :
नॉन एसी ट्रेन : ₹१४,१००
थ्री टियर एसी ट्रेन : ₹१८,१००
टू टियर एसी ट्रेन : ₹१९,१००
यात्रेच्या शुल्कामध्ये दोन वेळचे जेवण, एक वेळचा नाश्ता तसेच चार व्यक्तींमागे एका खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी पूर्ण भाडे आकारले जाणार आहे.


यात्रेसाठी बुकिंग करताना आधारकार्डची झेरॉक्स, मतदान कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणावा. प्रवासादरम्यान मूळ आधारकार्ड जवळ ठेवणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यात्रेच्या अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क :
९९२१५२९९९९ / ९०९६९१९१९१
श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट | श्री साई निर्माण ग्रुप
मा. श्री कैलास बाप कोते | मा. श्री विजय भाऊ कोते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button