Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
Blog

एसटी बसेस मध्ये डिजिटल पेमेंटची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात!ग्रामीण भागातही डिजिटल पेमेंट एसटी बसेस मध्ये सुरू करावेत प्रवाशांची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एसटी बस मधून डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही अशी सोय अनेक ठिकाणी दिसून येत नाही. तरी ग्रामीण भागातही अशी सोय बसेसमधून उपलब्ध करून द्यावी .अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
सर्वत्र डिजिटल पेमेंटचा जमाना आला आहे. साध्या पान टपरी, चहाच्या टपरीवरही डिजिटल पेमेंट केले जाते. पण ही सुविधा एसटी बसेस मध्ये नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण येत होती .सुट्ट्या पैशाची चंणचण भासत होती‌
पण उशिरा का होईना प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


य़ा माध्यमातून एसटीच्या ठाणे विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. आज घडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत असून एखादी छोटी वस्तू खरेदी केली तरी नागरिक ऑनलानद्वारे पैसे देतात. डिजिटलमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली.

kamlakar


अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र डिजिटल पेमेंटमुळे वाद होणार नाहीत. तसेच, सुट्ट्या पैशांची चिंताही प्रवाशांना राहणार नसून डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल, यासाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स एसटीच्या सेवेत आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोडचा वापर करून तिकीट काढत आहेत. ग्रामीण भागात एसटी बसेस मध्ये अनेक ठिकाणी अशी सुविधा अजूनही उपलब्ध नाही .ती सुरू करावी .अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button