Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
Blog

पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयास्पद ईसंमाना पोलिसांनी घेतले ताब्यात!

शिर्डी (प्रतिनिधी )
शिर्डी येथे रात्रीची पोलिसांची पेट्रोलिंग व कोबींग ऑपरेशन सुरू असताना शहरात विविध ठिकाणी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरीच्या इराद्याने फिरत असणाऱ्या व पोलिसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात


या संदर्भात अधिक माहिती अशी की ,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र रघुनाथ गोंदे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण पोलीस सब इंस्पेक्टर पगारे पोलीस नाईक वाळके, पवार, जराड आदी सरकारी जीप मधून पोलीस निरीक्षक सोपानराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून 26 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रीची पेट्रोलियम व कोबिंग ऑपरेशन करताना संस्थांनच्या गेट नंबर तीन जवळ पोपट प्रभाकर गायकवाड श्रीराम नगर शिर्डी (वय 30 )हा संशयास्पद फिरताना दिसला. रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी हा इसम येथे दिसल्यानंतर त्यास हटकवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्यास पकडण्यात आले.

DN SPORTS

त्याच दिवशी रात्री पेट्रोलिंग करत असताना साईश कॉर्नर जवळ वैभव राजेंद्र जाधव मेघा धर्मशाळा तळेवाडी शिर्डी हा इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री संस्थांनच्या गेट नंबर चार जवळ सुजित रोहिदास हातांगळे हा संशयास्पद फिरत असताना व पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तीनही ईसम रात्रीच्या वेळी संशयास्पद व सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरी करण्याचा इराद्याने फिरत असल्याचे संशयावरून मुंबई पोलीस कायदा कलम 122 नुसार या तीनही ईसमांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button