Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील साईबाबा मंदिरात हारफूल अर्पण करण्यास कोर्टाने दिली परवानगी शिर्डी ग्रामस्थ व शेतकरी मध्ये आनंदाचे वातावरण 

आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दोन वर्षांपूर्वी साई मंदिरात फुले, हार आणि प्रसाद आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. कोविडमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले होते. या बंदीमुळे शिर्डीतील फुलांचे व्यापारी आणि आजूबाजूच्या सुमारे चारशे एकर क्षेत्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. बंदी हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केलं होतं.

समितीच्या अहवालाच्या आधारे साई संस्थानच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी साई संस्थानने न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सर्वांना लवकरच परवानगी मिळेल अशी आशा वाटत होती. त्यातच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने फूल, हार नेण्यास परवानगी दिली आहे.

श्री साईबाबांना फुले हे प्रिय होते बाबांनी स्वहस्ते लेंडीबागेत फुलाची बाग फुलविली होती बाबा हयात असले पासून साईभक्त भक्तीभावाने बाबांना हार फुले अर्पण करीत असत असा उलैख साईचरीत्राता आहे त्यामुळे भक्तानं ची मागणी पुर्ण झाली आहे त्यामुळे फुले उत्पादक शेतकरी सुखवाला आहे कोर्टाच्या  निर्णयाचे स्वागत  कमलाकर कोते जिल्हाप्रमुख शिवसेना

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button