Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

शिर्डीत करोडोंचा चुना लावून ग्रो मोअर ट्रेडिंग नामक कंपनीचा मास्टरमाईंड फरार 

शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव प्रमाणे शिर्डीतही शेअर्स मार्केट गुंतवणूक नावाखाली कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याची मोठी चर्चा असून शिर्डी व परिसरात‌ असून  त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करत असणाऱ्या एका व्यक्तीने ग्रो मोअर ट्रेडिंग नामक कंपनी काढून व   आपले दोन चुलत भाऊ व एका मित्राला या कंपनीत एजंट म्हणून घेऊन अनेकांना वेगवेगळ्या मार्गाने व गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत या

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कंपनीमध्ये रक्कम गुंतवण्यास अनेकांना भाग पाडले. सुरुवातीला आमच्या कंपनीकडे भरपूर पैसे असून गुंतवणूकदारांचे पैसेही गोळा करून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवून ठेवतो .असे भासवत व बँक व इतर ठिकाणापेक्षा जास्त परतावा देत प्रथम विश्वास संपादन केला.प्रथम लाखो रुपये गोळा केले. त्यांना प्रथम चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे ह्या गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईक मित्रांनाही या कंपनीच्या एजंट व मालक यांच्या आमिषाला बळी पडत शेती विकून, वाहने विकून, घरातील सोने

चांदीचे दागिने विकून एवढेच नव्हे तर इतर सोसायटी बँका या ठिकाणाहून कर्ज घेऊन या कंपनीमध्ये जादा परतावा मिळेल या आशेने मोठी गुंतवणूक केली. असा हा चार ते पाच वर्ष प्रकार सुरू होता. अनेकांना परतावा चांगला मिळत असल्यामुळे त्यांचा व इतरांचा विश्वास बसत गेला. फेस टू फेस जाहिरात होत गेली. त्यामुळे गुंतवणूकदारांची साखळी वाढत गेली. त्यानंतर या कंपनीचे मालक व एजंट यांनी१ लाख रुपये घेण्याचे बंद करून तीन लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांचीच गुंतवणूक स्वीकारली जाण्याचे

जाहीर करून आणखी मोठीरक्कम जमा करण्याची चैन वाढवली.  अनेकांकडून कोट्यवधी  रुपये जमा  होत‌‌ होते. मालक एजंट ऐश करत होते. या कंपनीच्या मालकाचा साखरपुडा नाशिक येथे लाख रुपये उधळत मोठ्या राजासारखा झाला. त्यातून इतरांना माझ्याकडे व कंपनीकडे कमी पैसे नाहीत हे दाखवण्याचा असा प्रयत्न केला गेला. मात्र आता हळूहळू या कंपनीचे पितळ उघड पडू लागले आहे. कंपनीचा मालक फरार व कार्यालय बंद आहे .फोनही बंद आहे. मात्र त्याचे एजंट येथे आजही उजळ माथ्याने

फिरत आहेत. मात्र तेही फोन उचललास टाळाटाळ करत आहेत. फोन उचलला तर गुंतवणूकदारांना पाच महिन्यात त्यांचे पैसे परत देऊ असे आश्वासन देत  आहेत. दोन महिने पूर्ण झाले आहेत तीन महिने बाकी आहेत. मात्र आत्तापासूनच या एजंट व मालकाला व कंपनीला घरघर लागली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही चिंताग्रस्त झाले आहेत. गुंतवणूकदारांकडून तशी चर्चा होत आहे. अनेक जण पैसे परत मिळावे म्हणून मोठे प्रयत्न करत आहेत .मात्र पूर्वीसारखा प्रतिसाद या एजंटाकडूनही मिळत नाही.

त्यामुळे आपले पैसे मिळतात की नाही ही शंका गुंतवणूकदारांना आहे. सध्या वेगवेगळे कारणे दाखवून या कंपनीचे मालक व ३ एजंट वेळ टाळून नेण्याचा  प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामुळे गुंतवणूक दारांना मोठा धक्का बसत आहे. सध्या शेवगावचे प्रकरण उघडकीस आले आहे. असे फसवणुकीचे प्रकार राज्यात, देशात घडले आहेत. तसे होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे.

मात्र जर इतर ठिकाणच्या प्रकाराप्रमाणेच हा फसवणुकीचा प्रकार किंवा पैसे गोळा करून पोबारा होण्याचा प्रकार घडला गेला तर मोठा पेच गुंतवणूकदारांपुढे होणार आहे. अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने रक्कम जमा करून ती या कंपनीत गुंतवली आहे . अनेकांनी तर घरात सुद्धा माहिती नाही. लोकांनी कर्ज घेऊन यामध्ये पैसे गुंतवले आहेत. जर गुंतवलेले पैसे परत मिळाले नाही तर मोठी पंचायत होणार आहे.  

मात्र अनेकांना या गोष्टी चर्चाही करता येईना व तक्रार ही दाखल करता येईना .अशी परिस्थिती झाली आहे. मात्र यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. याची प्रशासनाने गुप्त पद्धतीने चौकशी करावी. अशी मागणी आता गुंतवणूकदारांकडून होत आहे.क्रमशः उद्याच्या अंकात

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button