Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
अ.नगरशिर्डी

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डीत घेतले साईदर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) भारताचे माजी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी आज मंगळवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांचे समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थान च्या वतीने संस्थांनच्या तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती, श्री साई सत चरित्र ग्रंथ, शाल, देऊन त्यांचा सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी दादरा व नगर हवेली दमन व दिव व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
रामनाथ कोविंद भारताचे १४वे राष्ट्रपती होते.
रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यातील आहेत.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्री शिर्डीत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिर्डीत येत पत्नी कविता कोविंद यांच्यासह साई मंदिरात जावून साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी कोविंद यांनी साईबाबांच्या समाधीवर वस्त्रही अर्पण केलं. तसंच याप्रसंगी साईबाबा संस्थानचा वतीनं शाल आणि साईबाबांची मूर्ती देवून कोविंद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कोविंद यांनी, “मी माझं सौभाग्य मानतो की नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीला येवून साईबाबांच दर्शन घेता आलं. संपूर्ण मानवजातीच्या सुख शांतीसाठी साईंच्या चरणी प्रार्थना केली. तसंच देश आणि अखंड जग ज्या आव्हानांना सामोरं जात आहे, त्या आव्हानांना पेलण्यासाठीदेखील साई चरणी प्रार्थना केली असून येणारं नवीन 2025 हे वर्ष संपूर्ण मानव जातीसाठी सुखकारक आणि भरभराटीचं जावो,”

अशी प्रार्थना साई चरणी केल्याचं म्हटलंय.दरम्यान, रामनाथ कोविंद मंदिर परिसरामधून साई मंदिरात जात असताना उपस्थित असलेल्या भाविकांना त्यांनी अभिवादन केलं. तसंच यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या काही लहान मुलांनी कोविंद यांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छाही दिल्या.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साईंच्या दर्शनासाठी येणार असल्यानं भाविकांनी त्यांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. यापूर्वी रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदी असताना 1 ऑक्टोबर 2017 रोजी साई समाधी शाताब्दी वर्षाचे तसंच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन देखील कोविंद यांच्या हस्ते पार पडलं होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button